प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रतिपादन, जीवन विद्या मिशनतर्फे व्याख्यानमाला
वार्ताहर /पणजी
आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी, कृतज्ञ असावे. कृतज्ञता ही शक्ती आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही समाधानी राहून मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती सहज साध्य होते, असे स्पष्ट करून जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी, सुख दुसऱयाला देण्याने आपल्याला प्राप्त होते. दान हा सुखाचा पासवर्ड आहे असे प्रतिपादन रविवारी येथे केले.
जीवन विद्या मिशनतर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहमध्ये प्रल्हाद पै यांचे ’सुखाचा पासवर्ड’ या विषयावर श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत व्याख्यान झाले,त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कृतज्ञता हा सकारात्मक विचार आहे,ती मोठी शक्ती आहे. आपण ज्या स्थितीत आहोत त्यात समाधानी असले पाहिजे कारण आपल्यापेक्षा कितीतरी वाईट परिस्थिती असलेले गरीब लोक मोठय़ा संख्येने आहेत. आपण आपल्यापुरता विचार करतो परंतु माणूस एकटा जगू शकत नाही हे कोविडने दाखवून दिले आहे.तुम्ही इतरांचा विचार कराल तेव्हा इतर तुमचा विचार करतील.इतरांच्या सुखाचाही थोडा केला पाहिजे व त्याची फलश्रुती काय आहे हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितले आहे.
सुख देण्याने मिळते हा निसर्गाचा नियम आहे. पूर्वजांनी त्याला कर्मसिद्धा?त म्हटले आहे.भरपूर पैसा कमावून, इस्टेट जमाकरून कोणी सुखी झालेला नाही.पैशातूनच नव्हे तर स्मितहात्स्य, शुभेच्छा,आदर या माध्यमातून सुद्धा इतरांना सुख देता येते त्यासाठी खर्च करावा लागत नाही. देण्यात ’ग्रेस’ असते देण्यात ’टेस’ असतो.पेराल त्याच्या अनेकपटीने उगवेल हा जीवन विद्या मिशनचा सिद्धा?त आहे.
पूनम बुर्ये यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त बन्सीधर राणे यांनी आभार मानले. 6 ऑगस्ट रोजी जीवन विद्या मिशनतर्फे सुभाष केळकर यांचे आयएमबी सभागृहात व्याख्यान होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.









