अननस, फणस, आंबे, वडाची पाने, द्रोण विक्रीसाठी उपलब्ध
प्रतिनिधी /डिचोली
येत्या मंगळवारी साजरा होणाऱया वटपौर्णिमा सणासाठी डिचोली बाजारात सामान दाखल झाले आहे. वडाच्या झाडाची पूजा करून सात फेरे मारत सौभाग्याचा धागा सुवासिनी महिला मंगळवारी गुंफणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.
या वटपौर्णिमेसाठी बाजारात वडाच्या फांद्या, पाने, द्रोण, फणस, आंबे, अननस, अनशीचे दोर, बांगडय़ा व इतर आवश्यक वस्तू दाखल झाल्या आहेत. दरवषीपेक्षा यावषी प्रत्येक वस्तूचे दर चढेच आहे. तरीही त्या खरेदीसाठी बाजारात महिलंची आज झुंबड पडणार आहे.









