आदित्य रॉय कपूर कमांडो लुकमध्ये
आदित्य रॉय कपूर अन् संजना संघी यांचा चित्रपट ‘ओम ः द बॅटल विदइन’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये आदित्य ऍक्शन हिरो म्हणून दिसून येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आदित्यने स्वतःच्या शैलीद्वारे चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात आदित्य देशासाठी लढणारा सैनिक म्हणून दिसून येणार आहे.

या चित्रपटात संजना सांघी नायिकेच्या भूमिकेत आहे. कमांडो सोल्जर म्हणून भूमिका साकारत असलेल्या आदित्याची या ट्रेलरमध्ये विशेष छाप दिसून येत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ हे वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात आशुतोष राणा, प्राची शाह तसेच प्रकाश राज देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी पेले आहे.
झी स्टुडिओज, शायरा खान आणि अहमद खान यांच्याकडून निमित्त ‘ओम ः द बॅटल विदइन’ हा चित्रपट 1 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आदित्य रॉय कपूर यापूर्वी ‘ओके जानू’, ‘फितूर’, ‘आशिकी 2’, ‘डियर जिंदगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे.









