सेंट जॉन्स-अँटिग्वा : क्रिकेट विंडीजने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी गुरुवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला. दोन सामन्यांची ही मालिका दि. 16 जूनपासून अँटिग्वातील सर व्हिवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱया पहिल्या सामन्याने सुरु होत आहे. त्यानंतर दुसरी लढत सेंट ल्युसियातील डॅरेन सॅमी स्टेडियमवर खेळवली जाईल. 12 सदस्यीय विंडीज संघात डेव्हॉन थॉमस, मॉती व अँडरसन फिलीप या तीन नवोदितांचा समावेश करण्यात आला. या मालिकेत विंडीजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे असेल. अनुभवी सीमर केमर रोशला अद्यापही 13 वा खेळाडू या नात्याने संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
विंडीज संघ : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जेरमेन ब्लॅकवूड, बॉनर, जॉन कॅम्पबेल, जोशुआ डा सिल्व्हा, अल्झारी जोसेफ, काईल मेयर्स, मॉती, अँडरसन फिलीप, रेमन रेफर, सील्स, डेव्हॉन थॉमस. राखीव : तेगनरेन चंदरपॉल, शेरमॉन लुईस.