प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व लोककल्प फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशनने जांबोटी येथे नंदादीप नेत्र चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील सर्व ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. अनेक ग्रामस्थांना चष्म्याची गरज होती. लोककल्प फौंडेशनतर्फे जवळपास 50 गावकऱयांना चष्मे देण्यात आले.
जयराम कृष्णाजी देसाई माजी जिल्हा पंचायत सदस्य संतोष कदम व लोककल्प स्वयंसेवक सुहासिनी पेडणेकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. जांबोटी गाव लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांतर्गत येते. गावकऱयांचे आरोग्य सुधारणे शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे. दुर्गम भागातील नागरिकांना लोककल्प फौंडेशनच्या विविध योजनांचा खूप उपयोग होत आहे. समस्त गावकऱयांनी लोकमान्य सोसायटी व लोककल्प फौंडेशनचे आभार मानले. या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले असून लोककल्प फौंडेशनने त्यांचे आभार मानले आहेत.









