मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची उपस्थिती
प्रतिनिधी /मडगाव
जागतीक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने ‘नाल्सा’च्या आणि वन खात्याच्या सहकार्याने दक्षिण गोवा जिल्हा कायदा प्राधिकरणाने 5 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाच्या (नाल्सा) विविध योजनांची माहिती दिली.
गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक यांच्याहस्ते वृक्ष रोपणाचा कार्यक्रम झाला.
दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इर्शाद आगा, गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव विजया आम्रे, प्रो पेदालेर्झ क्लब, मडगावचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा कायदा प्राधिकरणाच्या सचिवा सारिका फळदेसाई, वन संरक्षक खात्याचे संचालक अनिकेत नाईक गावकर यावेळी उपस्थित होते.
वृक्ष रोपणाच्या या कार्यक्रमाला सुमारे 120 जण होते. वैद्यकीय गुण असलेल्या आणि फळांचे उत्पादन देणाऱया रोपटय़ांचे यावेळी वितरण करण्यात आले.









