‘पुण्यशील राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले स्मृती गौरव कृषी सन्मान ’
प्रतिनिधी/ सातारा
पुण्यशील राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले ग्रंथालय, सातारा यांचेवतीने दिला जाणारा यावर्षीचा ‘पुण्यशील राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले स्मृती गौरव कृषी’ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना प्रदान करणेत आला. हा पुरस्कार सोहळा श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले, श्रीमंत छ. वृशालीराजे भोसले, गुरुवर्य श्री. संभाजीराव पाटणे सर आणि तसेच जिल्हा बँकेचे आजी माजी अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
श्रीमंत मनाचे एक पुण्यशील दर्शन म्हणजे राजमाता सुमिनाराजे भोसले. त्या मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू होत्या. त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नावे गुरुवर्य श्री. संभाजीराव पाटणे सर यांच्या पुढाकाराने पुण्यशील त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले ग्रंथालय, सातारा यांचे विद्यमाने दरवर्षी प्रतिथ यश संशोधक व सहकारामध्ये उल्लेखनिय काम केलेल्या व्यक्तिस पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर चे माजी सहसचिव श्री. एन जी. गायकवाड, सातारा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, जेष्ठ समाजसेविका सौ. प्रमोदिनी मंडपे, माजी नगरसेविका सौ. स्नेहा नलावडे यांनाही यावेळी सदर पुरस्काराने सन्मानित करणेत आले.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी तीस देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून शेतीविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. कृषी व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल विविध नामवंत संस्थांनी त्यांना वीस पेक्षाही जास्त पुरस्काराने सन्मानित केले आहे. बँकिंग प्रंटायर्स मुंबई, कर्नाडस् बँकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, कोल्हापूर तसेच राज्य बँक असोसिएशन मुंबई यांचेवतीने डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’म्हणून त्यांच्या सर्वंकष बाबींची नोंद घेवून विविध संस्थांनी जवळपास 20 राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.
सदर पुरस्कार मिळालेबद्दल बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील, संचालिका सौ. कांचन साळुंखे, संचालक श्री. शिवरूपराजे खर्डेकर, श्री. रामराव लेंभे, श्री. सुरेश सावंत, सौ. ऋतुजा पाटील, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री .राजेंद्र भिलारे यांचेमार्फत डॉ. राजेंद्र सरकाळे यांचा यथोचित सत्कार करणेत आला. अध्यक्ष श्री. नितिन पाटील यांनी डॉ. राजेंद्र सरकाळेयांच्या कामकाजाबद्दल कौतुक करून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेछ्या दिल्या.
सदर पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार व पणन मंत्री मा. ना. बाळासाहेब पाटील, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई, सर्व संचालक मंडळ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे माजी सरव्यवस्थापक श्री. मधुकर जाधव, व्यवस्थापक श्री. राजेंद्र खळदकर, श्री. सुजित शेख, सर्व विभागांचे व्यवस्थापक अधिकारी व सेवक, गटसचिव, सहकार क्षेत्रातील आजी-माजी, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.








