लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 जून हा जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. नॅशनल हेल्थ पोर्टलच्या मते, जगभरात दररोज ब्रेन ट्यूमरच्या 500 हून अधिक रुग्णांचे निदान केले जाते. ‘टूगेदर वी आर स्ट्राँगर’ अशी यंदाची थीम आहे. बऱ्याचदा अनेकांना ब्रेन ट्यूमरबद्दल माहिती नसते आज आम्ही तुम्हाला ब्रेन ट्यूमरचे कारण, लक्षणे काय आहेत हे सांगणार आहोत.
ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?
ब्रेन ट्यूमर हा एक विकार आहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशी असामान्यपणे वाढतात. मेंदूमधील गाठींना ब्रेन ट्युमर म्हणतात. यात दोन प्रकारच्या गाठींचा समावेश असतो. एक म्हणजे कॅन्सरविरहित आणि दुसरी कॅन्सरची. पेशी असामान्य असतील तर तो घातक असतो.
ब्रेन ट्यूमरची कारणे
एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वयात ब्रेन ट्यूमरचा त्रास होऊ शकतो. मात्र ब्रेन ट्युमरचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोबाईल फोनचा अतिवापर केल्याने ब्रेन ट्यूमर होतो असे म्हटले जाते मात्र हे अद्याप संशोधनात सिध्द झाले नाही.
लक्षणे
कॅन्सरच्या लक्षणामध्ये तुम्हाला सकाळपासूनच डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागतो. याशिवाय उलट्या, आकडी तसेच फिटस् येतात. डोकेदुखी हे लक्षण सलग दोन महिने कायम राहते.स्तन, थायरॅाईड, फुफ्फुसांमधून परावर्तित झालेला सेंकडरी कॅन्सर मेंदूमध्ये होण्याची शक्यताही असते.
उपचार पध्दती
ट्यूमरची गाढ कशी आहे त्यानुसार उपचार केले जातात. तसेच स्टिरिओटॅक्टीट पद्धतीने बायोप्सी,एन्डोस्कोपीची बायोप्सी, रेडिओथेरपी, केमोथेरपी या पध्दतींचा वापर केला जातो.
Previous Articleकर्जांचे हप्ते वाढणार! रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला
Next Article पुलाची शिरोलीत नदीकाठावर सापडले मगरीचे पिल्लू









