सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडी वार्ताहर मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी या कॉलेज ने आपल्या यशाची परंपरा कायम राखत यंदाही सलग चौथ्या वर्षी १२वी चा १००% निकाल लावलेला आहे. शाखानिहाय निकाल पुढीप्रमाणे:सायन्स-प्रथम: सानिका संजय पुरळकर (८५.००%)द्वितीय: अंतरा जितेंद्र सावंत (८१.१७%)तृतीय: तन्मय सुनील मुननकर (८०.६७%) कॉमर्स:प्रथम: सॅनिटा अँथनी रॉड्रिग्स (९४.८३%)द्वितीय: शर्विन फिमेन लेमोस (९२.३३%)तृतीय: पूजा राजन परब (८४.१७%) यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे चेअरमन मान. बिशप ऑल्विन बरेटो, सेक्रेटरी मान. फादर मनवेल डिसिल्वा , प्राचार्य फादर रिचर्ड सालदाना, प्रशालेचे मॅनेजर मिलेट डिसोझा , उप प्राचार्या सिस्टर मेबल कार्वालो, सुपरवायझर मेघना राऊळ, जुनियर कॉलेजचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.









