प्रतिनिधी /बेळगाव
हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया ऍथलेटीक्स स्पर्धेसाठी जीएसएस महाविद्यालयाची खेळाडू ऐश्वर्या नेसरकरची कर्नाटक राज्य ऍथलेटीक्स संघात निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेत ऐश्वर्या हिरोजी नेसरकरने तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळविले होते. या कामगिरीमुळे तिची पंचकुलातील खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली. ती जीएसएस महाविद्यालयात बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकत असून, ती क्रीडाभारती डायनॅमिक क्लब येथे सराव करीत आहे. तिला प्रशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन तर जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एल. मजुकर, क्रीडा प्राध्यापक प्रशांत मनकाळे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









