कायदामंत्री मधुस्वामी यांचे आवाहन : बार असोसिएशन येथे कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे नेते मंडळी बेळगावात दाखल होत आहेत. मंगळवारी राज्याचे कायदामंत्री मधुस्वामी यांच्यासह इतर विधान परिषद सदस्यांनी बार असोसिएशनला भेट देऊन भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन केले आहे. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रभू यतनट्टी, विधानपरिषद सदस्य नारायण स्वामी, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उपस्थित होते.