ऑनलाईन टीम/ तरुण भारत
महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप ही पाऊस न झाल्याने हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhusae) यांनी केले आहे. दरम्यान १२ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.
पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल आणि १२ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत.
सहा जूनला पाऊस दाखल होणार म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी आधीच करुन ठेवली आहे. मात्र पाऊस पुढे गेल्याने शेतकरी नाराज झाला आहे. पेरणी करण्यासाठी हे वातावरण अनुकल नसल्याने पेरणी करु नका असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.