प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या येत्या दि. 11 जून रोजी गोव्यात येत आहेत. आपल्या गोवा दौऱयात त्या पाटो – पणजी येथील केंद्रीय अबकारी कार्यालयातील समारंभात सहभागी होतील. त्याचबरोबर गोवा मनोरंजन संस्थेच्या सभागृहातही एका कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. दोन्ही कार्यक्रम हे अनुक्रमे दुपारी 3.30 आणि 4 वा. होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व जीएसटी विभाग पाहणारे मंत्री माविन गुदिन्हो हे सहभागी होणार आहेत.









