आधार लिंक केलेले आयआरसीटीसी वापरकत महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकतील
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आता रेल्वे प्रवासी अधिकाधिक तिकिटे ऑनलाईन बुक करू शकतील. आयआरसीटीसीचा वापर करून ऑनलाईन तिकीट बुक करणाऱया वापरकर्त्यांना आता एका महिन्यात 6 ऐवजी 12 तिकीटे बुक करता येणार आहेत. तसेच आधार लिंक युजर आयडी असलेल्या आयआरसीटीसी ग्राहकांसाठी जास्तीत जास्त तिकीट बुक संख्या 12 वरून 24 करण्यात आली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी तिकीट बुक करण्यासाठी समान आयडी वापरणाऱयांना याचा फायदा होणार आहे.
नव्या नियमांनुसार आता रेल्वे प्रवासी एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकीट काढू शकतील. हे नियम लागू करण्यात आले आहेत. रेल्वे प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बुक करतात. आयआरसीटीसी वापरकर्ते ज्यांचे आयडी आधारशी लिंक केले आहे ते आता एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकतात. त्याचवेळी, ज्या प्रवाशांचा यूजर आयडी आधारशी लिंक नाही, ते सध्या फक्त 6 तिकिटे बुक करू शकतात. मात्र, आयआरसीटीसीने नव्या नियमांमध्ये ही संख्या 12 पर्यंत वाढवल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयडीला आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया
1. आयआरसीटीसीच्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाईटला भेट द्या.
2. लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
3. मुख्य पृ÷ावरील ‘माय अकाऊंट’ मधील ‘आधार केवायसी’ वर क्लिक करा.
4. आता आधार क्रमांक टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.
5. आधार कार्डवर नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी येईल.
6. ओटीपी टाकल्यानंतर, आधारशी संबंधित माहिती पडताळून ‘व्हेरिफाय’वर क्लिक करा.
7. आता मोबाईलवर केवायसी तपशील यशस्वीरित्या अपडेट झाल्याचा एसएमएस येईल.
,









