प्रेमसंबंधातुन जीवन संपवल्याची चर्चा
जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील एकुंडी येथे सोमवारी सकाळी एका नवविवाहित तरुणीने आणि बावीस वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण संभाजी शिंदे वय 22 व नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी वय 21 अशी त्यांची नावे आहेत. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते त्यातूनच त्यांनी आपले जीवन संपवलेची चर्चा घटनास्थळी होती.
अधिक माहिती अशी, सहा दिवसापूर्वीच म्हणजे 1 जून रोजी अश्विनीचा विवाह सलगरे तालुका मिरज येथील तरुणाशी झाला होता. लग्नानंतर ती रविवारी एकुंडी येथे आली होती. त्यानंतर सोमवारी या दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. त्यापूर्वी फोन करून हा निर्णय घेतला असल्याचा आंदाज व्यक्त होत आहे. दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद पोलिसात झाली असून तपास पोलिस करीत आहेत.