नांद्रे प्रतिनिधी
शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन व जतन करण्यासाठि केलेल्या कामगिरीबद्दल नांद्रे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
वसुंधरा अभियानांतर्गत 2021-22 मध्ये संबंधीत पर्यावरण विभागाने सर्व ग्रामपंचायतींना सहभाग घेण्यास मुभा देण्यात आली होती. 2021 पासूनच प्राधान्यक्रमाने नांद्रे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबिवले गेले. जिल्हातील 699 पैकी 693 ग्रामपंचायतीनी सहभाग घेत राज्यात आघाडी घेतली होती.
नांद्रे ग्रामपंचायत कार्यक्षेञात अभियान अंतर्गत पुथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वावर ग्रामपंचायतीने उत्तम कामगिरी केली. ‘माझी वसुंधरा’ अभियानात नांद्रे ग्रामपंचायतीची कामगिरी उत्कुष्ट ठरल्याने नांद्रे ग्रामपंचायतीचा सन्मान झाला. हा राज्यस्तरीय वसुंधरा पुरस्कार वितरण मुंबईत मुख्यमंञी उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार, पर्यावरण मंञी आदित्य ठाकरे व अन्य मंञ्याच्या उपस्थितीत झाला. नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच डॉ. दिपाली नांद्रेकर यांनी स्विकारला. यावेळी उपसरपंच नेमगोंडा पाटील, माजी उपसरपंच सुहास पाटील, ग्रामसेवक रोखडे, कर्मचारी किरण पाचोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.