वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. रेहोबोथ बीच परिसरात एक विमान अचानक नो फ्लाय झोनमध्ये घुसल्याचे पाहून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. जो बायडेन यांना तात्काळ त्यांच्या पत्नीसह सेफ हाऊसमध्ये पाठवण्यात आले. एक लहान खासगी विमान चुकून राष्ट्राध्यक्षांच्या डेलावेअर येथील निवासानजीक पोहोचल्याचे व्हाईट हाऊस आणि सीपेट सर्व्हिसने सांगितले. सदर भाग नो-फ्लाय झोनमध्ये येत असल्याने वेळीच सर्व यंत्रणांनी सतर्कता जारी करून सुरक्षेची शहानिशा केली. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.









