आयफा पुरस्कारांचे अबुधाबीमध्ये वितरण
अबुधाबीमध्ये शनिवारी आयफा पुरस्कारांचे वितरण झाले आहे. या पुरस्कारसोहळय़ात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या ‘शेरशाह’ या चित्रपटाचा वरचष्मा दिसून आला. ‘शेरशाह’ची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आणि तसेच या चित्रपटाला 4 पुरस्कार मिळाले आहेत. ‘सरदार उधम’साठी विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘मिमी’साठी क्रीति सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
शेरशाह’साठी विष्णू वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळय़ात सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, विक्की कौशल, क्रीति सेनॉन, अनन्या पांडे, सारा अली खान, ए.आर. रहमान, टायगर श्रॉफ, नोरा फतेही, नर्गिस फाखरी आणि पंकज त्रिपाठी समवेत अनेक कलाकार सामील झाले.
‘बंटी और बबली 2’ चित्रपटासाठी शर्वरी वाघला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)चा मान मिळाला. सई ताम्हणकरला ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘83’ चित्रपटातील ‘लहरा दो’ या गाण्यासाठी कौसर मुनीर यांना सर्वोत्कृष्ट गीतासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लूडो’मधील अभिनयासाठी पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. सुनील शेट्टीचा पुत्र अहानला ‘तडप’ चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण)चा पुरस्कार देण्यात आला.
आयफा पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विष्णूवर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्की कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रीति सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहायक) पंकज त्रिपाठी (लूडो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहाय्यक) सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण) अहान शेट्टी (तडप)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) शर्वरी वाघ (बंटी और बबली 2)
सर्वोत्कृष्ट गायक जुबिन नौटियाल (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट गायिका असीस कौर (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पटकथा अनुराग बसू (लूडो)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान (अतरंगी रे)