राजरोसपणे विक्री सुरूच, निर्बंध न घातल्यास पर्यावरणाचा होणार ऱहास
प्रतिनिधी/ बेळगाव
पर्यावरण स्वच्छ व निर्मळ ठेवण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे. त्यामुळे प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबत अधिसूचना जारी केली होती. मात्र ही घोषणा केवळ एक फार्स ठरली आहे. प्लास्टिकचा वापर वाढविण्यात आला असून सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत.
बेळगाव शहराबरोबरच तालुक्मयातही प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र केवळ मोजक्मयाच दिवसांत ही मोहीम बंद पडली आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर होतो त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दंड आकारल्यास काहीअंशी प्लास्टिकवर निर्बंध येऊ शकतात. मात्र तसे होताना दिसत नाही. जनजागृती करण्यात आली मात्र काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नागरिकांनी तरी स्वतःहून पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
जनतेने स्वतःहूनच प्लास्टिक वापरणे बंद करणे आवश्यक
जनतेने स्वतःहूनच प्लास्टिक वापरणे बंद करावे. प्लास्टिक कॅरीबॅग, प्लास्टिक चमचा, प्लास्टिकचा ग्लास, प्लास्टिकचे फ्लेक्स बोर्ड, प्लास्टिकचे मोठे कव्हर याचबरोबर प्लास्टिकच्या इतर वस्तूंवर बंदी घातली गेली आहे. प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी महापालिकेने पाच पथके निर्माण केली होती. मात्र ही पथके गेली कोठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अधिकारीही डोळय़ांवर कातडे ओढून झोपेचे सोंग घेत असून यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे याकडे आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे.
प्लास्टिक विक्री करणाऱयांवर व वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई काही दिवस करण्यात आली. याचबरोबर प्लास्टिकचे साहित्य जप्त केले गेले. मात्र त्यानंतरही प्लास्टिकची विक्री सुरूच राहिली. दरम्यान वारंवार सांगूनही नागरिक किंवा व्यापारी ऐकत नसतील तर सेक्शन 5 प्रकारे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही सांगितले होते. मात्र हे सर्व इशारे फोल ठरले असून आता राजरोसपणे प्लास्टिक विक्री करण्यात येत आहे. तेंव्हा पुन्हा एकदा ही मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पर्यावरण अबाधित राहण्यासाठी प्लास्टिक बंदी
प्लास्टिक बंद करण्यामागचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये. पर्यावरण अबाधित रहावे, स्वच्छ व सुंदर बेळगाव व्हावे यासाठीच हे प्रयत्न होते. मात्र याला बेळगावकरांनीही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. काही बोटावर मोजण्याइतके लोक सोडला तर सर्वच ठिकाणी प्लास्टिकचाच वापर करण्यात येत आहे. जनतेनेही प्लास्टिक न वापरता इतर कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वीच प्लास्टिक वापराविरोधात महापालिकेने कारवाई केली होती. अनेक व्यवसायिकांकडील प्लास्टिक मोठय़ाप्रमाणात जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या संदर्भात पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये 6 ते 8 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता ते पथकही गायब झाले असून प्लास्टिकचा वापर राजरोसपणे सुरू आहे. दरम्यान जर अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या काही दिवसांत पर्यावरणाला याचा मोठा फटका बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्लास्टिक बंदी करावी, अशी मागणी होत आहे.









