उद्यापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
तानाजी गल्ली येथील रेल्वेगेटच्या दुरुस्तीच्या कामाला शनिवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. दुपदरीकरणाच्या अंतिम टप्प्यातील काम केले जात असल्याने रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांना कपिलेश्वर उड्डाणपूल अथवा छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचा वापर करावा लागला. रेल्वेगेट बंद असल्याने शनिमंदिरनजीक वाहतूक कोंडी होत होती.
दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक नवा ट्रक घालण्यात आला होता. आता जुन्या ट्रकच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून करण्यात आले. पुढील दोन दिवस हे काम चालणार आहे. सोमवारी दुपारी 4 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. रेल्वेगेट बंद असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, तानाजी गल्ली, महाद्वार रोड या परिसरातील नागरिकांना उलटा प्रवास करत ये-जा करावी लागत असल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शनिमंदिरनजीक वाहतूक कोंडाr
तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद असल्यामुळे वाहतूक कपिलेश्वर ओव्हरब्रिजमार्गे वळविण्यात आली होती. त्यातच शनिवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात मोठी गर्दी होती. यामुळे शनिमंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांना ये-जा करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने वादावादीचे प्रकारही घडत होते.









