नॅशनल स्टुडंट युनियन बेळगाव शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
पाठय़पुस्तकामध्ये अनेक चुका केल्यानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱया नॅशनल स्टुडंट युनियनचे अध्यक्ष कीर्ती गणेश यांना अटक करण्यात आली. तेंव्हा त्यांची तातडीने सुटका करावी, या मागणीसाठी नॅशनल स्टुडंन्ट युनियन बेळगाव शाखेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपतींच्या नावाने हे निवेदन देण्यात आले. शालेय पुस्तकांमध्ये अनेक चुका व चुकीचा इतिहास सांगण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्याविरोधात नॅशनल स्टुडंन्ट युनियनच्यावतीने शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. हे लोकशाहीमध्ये चुकीचे आहे. तेंव्हा त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फैजान शेख यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.









