क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा युवा संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूर येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच ते बंद करण्यात आले आहे. याचबरोबर कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्याबाबत मंत्री मुरगेश निराणी यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. तेंव्हा तातडीने याबाबत पाऊल उचलावेत, या मागणीसाठी क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
कित्तूर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उद्योजकांना प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. याचबरोबर कौशल्य विकास केंद्र याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर काही दिवसच त्याठिकाणी काम करण्यात आले. मात्र त्यानंतर त्या कौशल्य केंद्रामध्ये कोणीच कर्मचारी नाहीत. तेंव्हा त्या ठिकाणी तातडीने पुन्हा कौशल्य विकास केंद्र सुरू करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महांतेश करबसण्णावर, महेश मलशेट्टी, विनायक गाणगी यांच्यासह इतर पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.









