ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप (bjp) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात थेट सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर महाविकास आघाडी सरकार निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप करत आहे. आता तर संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप या निवडणूकीत अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांना ईडी (ED) आणि सीबीआयची (CBI) भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले “भारतीय जनता पक्ष (BJP) अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना अमिश दाखवणार, प्रलोभना दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी (ED) आणि सीबीआयची (CBI) भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप करत भाजपाने यासाठी पैसे वाया घालवू नये कोणत्यातरी चांगल्या सामाजिक कार्यासाठी वापरावे” असा सल्लाही राऊतांनी दिला.
अपक्ष आमदारांवर टाकल्या जाणाऱ्या दबावातून भाजपाचं चरित्र उघड होत असल्याचं राऊत म्हणाले. “यातून भाजपाचं चरित्र उघड होतंय. महाराष्ट्रात या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात असतील, तर राज्याची जनता डोळसपणे पाहात आहे. चारही जागा महाविकास आघाडी व्यवस्थित जिंकणार आहे. उगीच भाजपाने त्यांचे पैसे वाया घालवू नयेत. एखाद्या सामाजिक कार्यात लावावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे समर्थ नेतृत्व आहेत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा सर्वात जास्त अनुभव आम्हाला आहे. पण आमच्या हातात ईडी, सीबीआय नाही. पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत हे लक्षात घ्या”, असं ते म्हणाले.
“महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी ते आम्ही निवडणूक लढवणार, या मतावर ठाम राहिले. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण जर त्यांनी निवडणूक (Elections) लढायचा निर्णय पक्का केला असेल, तर महाविकास आघाडीसुद्धा या राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा मजबूतीने या निवडणुकीत उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे आणि या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजेच ते या पक्षांना अमिश दाखवणार, प्रलोभना दाखवणार, त्यांच्यावर वेगळ्यावेगळ्या मार्गाने दबाव आणणार. परंतु, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. ज्यांच्यावर भाजपा दबाव आणते ते, आमचेच मित्र असून, ते आम्हाला सांगत आहेत कशाप्रकारे आम्हाला प्रेशर्स हे देत आहेत. शिवाय ईडी, सीबीआयची भीती दाखवते आहे. यामुळे भाजपाचे चारित्र्या उघड होतेय.”, असे संजय राऊत यांनी म्हटले.