वार्ताहर /किणये
बेळवट्टी येथील श्री गणेश मंदिराचा लोकार्पण सोहळा व प्राणप्रति÷ापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिराच्या मुख्य उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष डी. एन. देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष बी. देसाई, कृष्णकांत बिर्जे, बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक समरसेन पाटील, विठ्ठल नाकाडी, ऍड. सुरेश देसाई आदी उपस्थित होते.
सोमवारी गणेश मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शंकर देसाई यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. दुसऱया दिवशी संकेश्वर येथील मदन पुराणिक गुरुजी यांच्या अधिपत्याखाली होमहवन, शुद्धीकरण, पूजा-अर्चा आदी विधी पार पडल्या. मधुकर देसाई यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर गावातील माहेरवासिनींचा सत्कार करण्यात आला.
नूल (ता. गडहिंग्लज) येथील भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रति÷ापना व कळसारोहण कार्यक्रम पार पडला. ऍड. सुरेश देसाई यांनी कळस पूजन केले. बुधवारी सकाळी 11 वाजता मंदिराचा मुख्य लोकार्पण सोहळा झाला. यावेळी मंदिराचे फित कापून उद्घाटन डॉ. संतोष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. बैलूरचे कृष्णकांत बिर्जे यांनी मंदिराच्या गाभाऱयाचे उद्घाटन केले.
ओलमणी येथील हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत, सयाजी देसाई, नारायण नलावडे, रवींद्र हरगुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
बी. बी. देसाई, एन. के. नलावडे, मधुकर नलावडे, म्हाळू होसुरकर, मारुती चांदीलवकर, डॉ. अर्जुन पाटील, रामलिंग बाळू पाटील, वैष्णवी सुतार आदींच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. संतोष देसाई, ऍड. सुरेश देसाई, निंगो भोगण, मारुती कांबळे, संतोष नलावडे, नितीन पाटील, संजय नलावडे आदींचा सत्कार करण्यात आला. समरसेन पाटील, विठ्ठल नाकाडी, कृष्णकांत बिर्जे यांची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली. आर. बी. देसाई यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, मनोहर बेळगावकर आदींनी कार्यक्रमादरम्यान भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बेळवट्टी, इनाम बडस, बिजगर्णी, किणये, कर्ले, कल्लेहोळ, ओलमणी, नावगे आदी ठिकाणच्या भजनी मंडळांचे तीन दिवस भजनाचे कार्यक्रम झाले.









