सीगन चषक क्रिकेट स्पर्धा : शुभम, ओंकारची चमक

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सीगन चषक वरि÷ लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एन. डी. वॉरियर्स संघाने बेळगाव चॅलेंजर क्लब संघाचा 15 धावानी, टिळकवाडी क्रिकेट क्लब संघाने एक्स्ट्रिम संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. शुभम व्ही. व ओंकार चव्हाण यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एन. डी. वॉरियर्स संघाने 13 षटकात 3 बाद 120 धावा केल्या. रिहान अलीने 1 षटकार 6 चौकारासह 50 तर भूषणने 5 चौकारासह 31 धावा केल्या. बेळगाव चॅलेंजरतर्फे ओमकार, शुभम के, अली एम. यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव चॅलेंजर संघाने 18 षटकात 8 बाद 105 धावाच केल्या. संतोष कुलकर्णीने 2 षटकार, 5 चौकारासह 47, ओंकारने 1 षटकार 1 चौकारासह 17 धावा केल्या. ए. डी. वॉरियर्सतर्फे शुभमने 14 धावात 3, आर्यनने 17 धावात 3, महंमद कैफने 27 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात एक्स्ट्रिम संघाने 18 षटकात सर्व बाद 140 धावा केल्या. नवीन एच.ने 1 षटकार 2 चौकारासह 34, गुरूप्रसादने 6 चौकारासह 32, सागर अंगडीने 1 षटकार 2 चौकारासह 27 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे ओंकार चव्हाणने 23 धावात 3 तर अद्वैत एस.ने 15 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी संघाने 18 षटकात 7 बाद 140 धावाच केल्याने सामना टाय झाला. शिवलिंग एस.ने 1 षटकार, 1 चौकारासह 24 तर ओंकार चव्हाणने 3 चौकारासह 20 धावा केल्या. एक्स्ट्रिमतर्फे राजू एच.ने 23 धावात 3 गडी बाद केले. सामना टाय झाल्याने पंचांनी सुपर ओव्हर नियमाचा वापर केला. त्यामध्ये टिळकवाडी संघाने विजय संपादन केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर शुभम व ओंकार चव्हाण तर इम्पॅक्ट खेळाडू रिहान अली, अद्वैत एस. यांना चषक देवून गौरविण्यात आले.









