चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये जास्तीत जास्त लोकांना इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आत्मसात करण्यासाठी मजबूत चार्जिंगकरीता पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. हि बाब लक्षात घेत एमजी मोटार इंडिया आणि कॅस्ट्रोल इंडिया हे जिओ-बीपी यांच्यासोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहेत.
सदरच्या हातमिळवणीनंतर चारचाकी वाहनांसाठी ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण कण्यावर भर देणार आहेत. देशभरात ईव्ही ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी कॅस्ट्रोलसह सध्या वाहन सर्व्हिस नेटवर्कचाही विस्तार करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती आहे.
जिओ-बीपी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटिश पेट्रोलियमची संयुक्त भागीदारी आहे. जिओ-बीपीने म्हटले आहे, आम्ही एक अशी इकोसिस्टम बनवित आहोत, ज्यामध्ये ईव्ही व्हॅल्यू साखळीच्या सर्व हितधारकांना लाभ मिळणार आहे. जिओ-बीपीने मागील वर्षभरात भारतात दोन सर्वात मोठय़ा ईव्ही चार्जिग केंद्रांची उभारणी केली आहे.
ईव्ही-प्रेंडली रस्त्यांची निर्मिती होणार
धोरणात्मक भागीदारीचा उद्देश देशामध्ये एक मजबूत ईव्ही चार्जिंग आणि पायाभूत सुविधांची स्थापना करत इंटर सिटी आणि इंट्रा सिटी प्रवासासाठी ईव्ही-प्रेंडली रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती दोघांकडून देण्यात आली आहे. या माध्यमातून वाहन सर्व्हिसच्या नेटवर्कला कॅस्ट्रोलकडून चालना मिळणार आहे.









