आळते/प्रतिनिधी
युक्रेन – रशिया युद्धामुळे कच्च्या मालाची झालेली कमतरता ,त्यामुळे भारतीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमती, वाहतूक भाड्यात झालेली वाढ, कच्च्या मालामध्ये दहा टक्क्यापासून पस्तीस टक्क्यापर्यंत झालेली दरवाढ . यामुळे महिना सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे तसेच इतर संघानी अगोदरच केलेली दरवाढ . यामुळे गोकुळ दूध संघालाही पशुखाद्य दरवाढ करणे अपरिहार्य ठरत आहे. असे मत चेअरमन विश्र्वासराव पाटील यांनी व्यक्त केले. ते गोकुळ दुध संघ संलग्न संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादकांच्या मेळाव्यात बोलत होते . ही दरवाढ संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, हातकणंगले तालुक्यातील साठ हजार लिटर दुध इतरत्र जात आहे. तरी संचालक डॉ. मिणचेकर , शौमिका महाडिक व मुरलीधर जाधव यांनी प्रयत्न करून दुध संकलन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची वार्षीक उलाढाल सात हजार कोटी रुपयांची तर एकट्या गोकुळ दूध संघाची तीन हजार कोटी रुपयांची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरी आर्थीक वाहीनी गोकुळ दूध संघ आहे. ती फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
तसेच गोकुळ दूध संघाचा गाय दूध दर हा शाश्वत आहे. तसा खाजगी संघांचा नाही. त्यामुळे संस्था प्रतिनिधींनी तात्पुरती दरवाढीच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पाटील यांनी केले.
मेळाव्यात नुतन संचालक मुरलीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रास्ताविक माजी. आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. यावेळी बाळगोंडा पाटील (किणी), सुनिल भोकरे (कुंभोज ), अभिजित आरगे ( कुंभोज), प्रताप पाटील (माले) अस्लम मुल्लाणी (किणी), नितीन खाडे (सावर्डे), नितीन सुर्यवंशी (मनपाडळे) या दुध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यामध्ये संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. उदयकुमार मोगले , वैरण विकास व्यवस्थापक भरत मोळे, महालक्ष्मी पशुखाद्य व्यवस्थापक व्ही. डी. पाटील, केडीसी बँकेचे विभागीय अधिकारी बी. डी. चौगुले, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ऋषीकेश आंग्रे, विमा सल्लागार के. वाय. पाटील आदींनी दूध संकलन, जनावरांचे आरोग्य, वैरण उत्पादन व आहार नियोजन, कर्ज प्रकरण, विमा आदी बाबींवर मार्गदर्शन केले.
आभार उपव्यवस्थापक दत्ता वाघरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम. पी. पाटील यांनी केले. तर मेळाव्याचे नियोजन आर. एन. पाटील, सुरेश पाटील व हातकणंगले विभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. मेळाव्यास गोकुळ दुध संलग्न संस्था प्रतिनिधी व दुध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.