ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कानपुर दौऱ्याआधी मोठा हिंसाचार घडून आला आहे. मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात वादाची ठिणगी (Violence) पडल्याने दोन गटात तुफान दगडफेक (stone pelting) झाली. या दगडफेकीत दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथे सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर (Kanpur) दौऱ्यावर आहेत. मात्र मोदींच्या दौऱ्याआधीच दोन समाजात झाल्याने दोन गटात दगडफेक झाली. या दगडफेकीत दहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्यांचा वापर केला आहे.
उत्तर प्रदेश कानपूरमध्ये कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. यावेळी नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहेत. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान मोदी कानपूरमध्ये आल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी जाण्याआधीच मोठा वादंग झाला. यावेळी दोन गटात राडा झाला. या राड्यादरम्यान तुफान दगडफेक झाली. जमावाला पांगवण्यासाठी संबंधित परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतात असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.