ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, सहावी जागा निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. आज उमेदवार मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने आजचा दिवस महत्वाचा मानला जात असून, यासंदर्भात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहचले आहे. महाविकास आघाडीकडून छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई आणि सतेज पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपसमोर त्यांनी ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. थोडय़ाच वेळात या भेटीत काय ठरतं? आणि भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेतं का? हे पहावं लागणार आहे.