ऑनलाईन टीम/ तरुण भारत
काश्मीरच्या (Kashmir) कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून (Terrorists)आणखी एका हिंदूंची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विजय कुमार (Vija Kumar) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मूळचे राजस्थानचे असणारे विजय कुमार हे बॅंक मॅनेजर म्हणून काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरीक आणि सुरक्षारक्षकांना टार्गेट केले आहे. आज घडलेली ही ७ वी घटना आहे. यात पोलिस कर्मचारी, स्थानिक व्यक्ती तसेच टीव्ही कलाकर आणि शिक्षिकेचा समावेश आहे. त्यातच आज कुलगाम या ठिकाणी बॅंक मॅनेजर विजय कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने नागरीकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
अमित शाह बोलवणार महत्त्वाची बैठक
दहशतवाद्यांच्या हल्ल्याने काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांचा आता सर्वच स्तरातून जाहीर निषेध केला जातोय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३ जून रोजी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि इतरांसह काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकित लेफ्टनंट गव्हर्नर गृहमत्र्यांना माहिती देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज सिन्हा दिल्लीत दाखल होणार
जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरुन विरोधी पक्ष नेते केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेच्या पैलूचा विचार करावा लागेल असे अब्दुल्ला म्हणाले होते. त्यातच आता गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, एलजी मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरमधील सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत.