नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात पोहोचून पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आझम यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान रामपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱया पोटनिवडणुकीवर चर्चा झाल्याचे समजते. आझम खान यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत आझम यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा अखिलेश यांचा विचार आहे.









