ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना “क्लीन चिट” दिली. यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.
भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांना “देश का गद्दार (देशद्रोही) जैन यांचे किती काळ संरक्षण करणार” असा सवाल केला. तत्पुर्वी ईडीने केलेली कारवाई ही “पूर्णपणे बनावट आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित” आहे असे सांगून त्यांचे सरकार “कट्टर प्रामाणिक” आहे असे स्पष्टीकपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. केजरीवाल यांनी जैन यांना पाठिंबा दिल्यानंतर इराणी यांची टिप्पणी आली आहे.
या पत्रकार परिषदेत इराणी यांनी जैन यांच्यावरील आरोपासंदर्भात मुख्यमंत्री केजरीवाल विचारण्यासाठी इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कथित मालकीच्या चार शेल कंपन्यांची नावे सांगून, जैन हे या प्रकरणात सूचीबद्ध असलेल्या सर्व शेल कंपन्यांचे मालक आहेत हे खरे आहे का असा सवाल त्यांनी दिल्ली सरकारला केला.