स्वामी विवेकानंद केंद्रांमधील मुलांना आंबा-फराळाचे वाटप
प्रतिनिधी /बेळगाव
दैवज्ञ ब्राह्मण संघ, दैवज्ञ गणेशोत्सव यांच्यावतीने स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वामी विवेकानंद बाल कल्याण केंद्र येथे साजरी करण्यात आली.
दैवज्ञ संघाचे अध्यक्ष राजू बेकवाडकर व दैवज्ञ गणेशोत्सवाचे अध्यक्ष नितीन कलघटकर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विनायक कणबरकर यांनी सावरकर यांच्याविषयी माहिती दिली. संघातर्फे स्वामी विवेकानंद केंद्रांमधील मुलांना आंब्याचे व फराळाचे वाटप करण्यात
आले.
याप्रसंगी हेमंत मुतकेकर, देविदास काकतीकर, दीपक अडकुरकर, विशाल शिरोडकर, उमेश बांदिवडेकर, मोहन कलकटकर, प्रमोद कोलवेकर, प्रमोद पेडणेकर, नितीन नंद्याळकर, मंजू मोदगेकर, संजय बांदिवडेकर, शुभम कारेकर, राघवेंद्र काकतीकर, कमलेश हंलचाटे, पंचू पार्वती आदी उपस्थित होते.









