क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक ऍथलेटिक्स स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात येथील हेरवाडकर स्कूलची विद्यार्थिनी स्वरा शिंदेने 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक पटकावित यश संपादन केले.
बेंगळूर येथे कंठिरवा स्टेडियमवर झालेल्या मिनी ऑलिम्पिक 14 वर्षाखालील ऍथलेटिक्स स्पर्धेत हेरवाडकरच्या स्वरा शिंदेने 100 मी. व 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण तर 4ƒ100 मी. रिले स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. तिच्या या कामगिरीबद्दल तिला उत्कृष्ट ऍथलीट म्हणून गौरविण्यात आले. तिच्या या कामगिरीची दखल घेवून हेरवाडकर स्कूलचे प्राचार्य सुनील कुसाने, उपप्राचार्य अरुण पाटील, क्रीडाशिक्षक सोमशेखर हुद्दार यांच्या हस्ते स्वरा शिंदेचा खास गौरव करण्यात आला. तिला ऍथलेटिक प्रशिक्षक मधुकर देसाई, उमेश बेळगुंदकर, सुरज पाटील, आनंद आदींचे मार्गदर्शन लाभले.









