गांधीनगर / वृत्तसंस्था
माजी काँगेस नेते हार्दिक पटेल यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. ते उद्या, अर्थात गुरुवारी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पटेल यांनी काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर त्यांनी काँगेसमध्ये प्रवेश केला होता. ते गुजरात काँगेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी गांधी कुटुंबावर टीकेचे प्रहार केले होते. तसेच काँगेसचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा होती. आता त्यांनीच आपल्या भाजपप्रवेशाचा दिनांक घोषित केला आहे.









