वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱया राष्ट्रपती भवनावर ट्रकिंग उपकरणासह उडत असलेले एक गरुड आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. पावसानंतर हे गरुड राष्ट्रपती भवनाच्या पार्कमध्ये कोसळल्याचे आढळून आले. तर दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान गरुडाच्या शरीरावर टॅकिंग उपकरण बसविण्यात आले होते असे आढळून आले. त्यानंतर दिल्ली पोलीस विशेष विभागासह विविध गुप्तचर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. कदाचित वन्य विभागाकडून या पक्ष्यावर हे ट्रकिंग उपकरण बसविण्यात आले असावे अशीही शक्यता आहे. तरीही सुरक्षा यंत्रणांकडून मोठी दक्षता घेण्यात येत आहे.









