ऑनलाईन टीम/तरुण भारत
सांस्कृतिक मंत्रालय भारतीयांच्या ‘वांशिक शुद्धतेचा’ अभ्यास करणार आहे, असा दावा करणाऱ्या एका वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, देशाला ‘वांशिक शुद्धता’ नव्हे तर आर्थिक समृद्धी हवी आहे.
“गेल्या वेळी एका देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वांशिक शुद्धते’चा अभ्यास केला पण त्याचा शेवट चांगला झाला नाही. भारताला ‘वांशिक शुद्धता’ नको, तर नोकरीची सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी हवी आहे,” असे त्यांनी ट्विट केले.
‘भारतीयांच्या वांशिक शुद्धतेचा अभ्यास करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाला एका बातमीचा हवाला देत, राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गेल्या वेळी एका देशात संस्कृती मंत्रालयाने ‘वांशिक शुद्धतेचा अभ्यास केला होता, तेव्हा त्याचा शेवट चांगला झाला नाही. भारताला नोकरीची सुरक्षा आणि आर्थिक समृद्धी हवी आहे, ‘वांशिक शुद्धता’ नाही, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे.
संस्कृती मंत्रालय अनुवांशिक इतिहास स्थापित करण्यासाठी आणि भारतातील वांशिक शुद्धतेच्या अभ्यासासाठी DNA प्रोफाइलिंग किट आणि संबंधित अत्याधुनिक मशीन्स मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे.
भारताच्या कला आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सांस्कृतिक मंत्रालयाकडे आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वाढत्या आर्य-द्रविड वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे. तसेच कॉंग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये वांशिक संबंधावरून वाद देखील होत आहे.