ब्लड कॅन्सर आजाराने ग्रस्त : उपचार सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गणेश परशुराम गोडसे या विद्यार्थ्याला ब्लड कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतील या गुणवंत विद्यार्थ्याला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशवर सध्या केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, घरची परिस्थितीही बेताचीच असल्यामुळे कुटुंबाला शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे. इच्छुकांनी प्रिन्सिपल मराठी विद्यानिकेतन, खाते क्र. 1233000100160285 (पंजाब नॅशनल बँक), आयएफसी कोड पीयूएनबी 0123300 या खात्यावर शक्मय तेवढी रक्कम पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









