सोगलमधून झाले होते अपहरण
प्रतिनिधी /बेळगाव
गौंडवाड (ता. बेळगाव) येथील एका दोन वषीय बालिकेचे नऊ महिन्यांपूर्वी सोगल येथून अपहरण करण्यात आले आहे. तिचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
आरोही महादेव पवार (वय 2, रा. शिवाजी गल्ली, गौंडवाड, ता. बेळगाव) असे त्या बालिकेचे नाव आहे. दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी आरोहीचे कुटुंबीय देवदर्शनासाठी सोगलला गेले होते. दुपारी 2.30 ते 3 या वेळेत आरोही बेपत्ता झाली असून याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सुरुवातीला आरोहीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र नंतरच्या काळात यासाठी जोर लावण्यात आला नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले. सदर बालिकेविषयी कोणाला माहिती असल्यास मुरगोड पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









