रिधीमा विरेंद्रकुमारने नोंदवले दोन्ही विक्रम
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्वीमर्स क्लब व ऍक्वेरियस क्लब बेळगाव आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय सबज्युनियर, ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या तिसऱया दिवशी बेंगळूरच्या बसवणगुडी ऍक्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधीमा विरेंद्रकुमारने 50 व 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम नोंदवले.
जेएनएमसी जलतरण तलावात आयोजित या स्पर्धेच्या तिसऱया दिवशी रिधीमा विरेंद्रकुमारने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 29.77 से.वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याचप्रमाणे 100 मी. बॅकस्ट्रोकमध्येही तिने 1 मि.4.60 से. वेळेचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला. अशाप्रकारे बेळगावमध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन विक्रमांची नोंद झाली.









