वाढीसह वेतन 71 कोटी रुपयांवर : पारेख यांच्या नेतृत्वात कंपनीची वाटचाल मजबूत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
देशातील दुसऱया नंबरची सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून कार्यरत असणारी इन्फोसिस यांनी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांच्या वेतनात चालू वर्षात मजबूत वाढ केली आहे. सलिल पारेख यांचे वार्षिक वेतन (सॅलरी पॅकेज) 49 कोटी रुपये होते मात्र त्यामध्ये वाढ करुन वेतन 71.02 कोटी रुपये केले आहे. यासोबतच पारेख यांना 43 टक्के वेतन वाढ दिल्याची माहिती आहे.
सॉफ्टवेअर कंपनीने सीईओंना वेतनवाढ करत असताना म्हटले आहे, की इन्फोसिसने सलिल यांच्या नेतृत्वात मजबूत कामगिरी केली आहे. पारेख यांच्या वेतनवाढीचा हा निर्णय पाच वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी राहणार असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीची भरभराट
गुरुवारी सादर करण्यात आलेल्या इन्फोसिसच्या वार्षिक अहवालामध्ये सीईओ सलिल पारेख यांची वेतनवाढ करण्यात आल्याची माहिती दिली आहे. इन्फोसिसने आताच सलिल पारेख यांना व्यवस्थापकीय संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्त केले आहे. ते 1 जुलै 2022 ते 31 मार्च 2027 पर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत.
इन्फोसिसचे आतापर्यंतचे सीईओ
नाव कालावधी
नारायण मूर्ती … 1981 ते मार्च 2002
नंदन निलेकणी . मार्च 2002 ते एप्रिल 2007
क्रिस गोपालकृष्णन एप्रिल 2007 ते ऑगस्ट 2011
एसडी शिबुलाल ऑगस्ट 2011 ते जुलै 2014
विशाल सिक्का … ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2017
युबी प्रवीण राव ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018
सलिल पारेख … 2 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत
मोठा अनुभव पाठीशी
सलिल पारेख यांच्याकडे आयटी इंडस्ट्रीमधील 30 वर्षांपेक्षा अधिकाचा अनुभव आहे. त्यांनी जानेवारी 2018 मध्ये इन्फोसिसमध्ये एमडी व सीईओपद सांभाळले आहे.









