ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हनुमान चालीसा पठणावरून वादात सापडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका मुस्लिम धर्मगुरूने नवनीत राणा यांना फोन केला होता. हनुमान चालीसा म्हटल्यास ठार मारू, अशी धमकी त्याने फोनवर दिल्याचे राणा यांनी म्हटले आहे. राणा यांनी याप्रकरणी नवी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राणा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील दोन-तीन दिवसात आठ ते नऊ वेळा मला एकाने फोन केला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नाव कादरी असून, आपण मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगितले. सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारु, अशी धमकी त्याने दिली. तसेच फोनवरुन शिवीगाळ केल्याचा दावाही राणा यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अज्ञाताने अॅसिड फेकण्याची धमकी दिली होती. त्यामुळेही खळबळ उडाली होती.