आंबोली-वार्ताहर:-
आंबोली घाटात ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणारे वाहन दिसताच मोटरसायकल चालकाने ब्रेक मारल्याने मोटर सायकल रस्त्याच्या उजव्या बाजूस पडली तर मोटरसायकलस्वार ट्रकच्या मागील चाका खाली सापडल्याने चेंदामेंदा होऊन तो मृत्युमुखी पडला. सदर घटना मंगळवारी रात्रौ. साडे अकराच्या सुमारास आंबोली घाटात नानापाणी वळणाजवळ घडली. अपघातात ठार झालेला समीर शशिकांत जावध (वय ४२) नामक युवक हा वेताळ बांबर्डे येथील आहे.
सदरच्या अपघाताची भीषणता बघून मोटरसायकलस्वारा मागाहून येणाऱ्या मित्रास याचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. ही दोन्ही वाहने सावंतवाडीहून बेळगांवच्या दिशेने जात होती. हा अपघात साधारणतः साडे अकरा- पावणेबाराच्या सुमारास घडला. पुढील तपास पोलिस करत आहेत.









