वनमंत्री उल्लेखीत जमिनीत प्रतापसिंहही मालक : अविभाजित जमिनीत अन्य अठराजणांचा वाटा,विश्वजित राणे यांच्या भूमिकेमुळे प्रकरणाला वळण
प्रतिनिधी /पणजी
सत्तरी तालुक्यातील सध्या गाजत असलेल्या वाघेरी डोंगरावरील झाडे नेमकी कोणी तोडली याबाबत अनभिज्ञ असलेल्या वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणी काही जमीन मालकांवर आरोप केले आहेत. त्यांनी अपली जमीन गोव्याबाहेरील व्यक्तींना विकलेली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश त्यांनी वन अधिकाऱयांना दिला आहेत. तथापी वाघेरी डोंगराच्या मालकी हक्काचा दावा करणाऱयांमध्ये प्रतापसिंह रावजी राणे सरदेसाई यांचे नाव पहिल्या स्थानावर असल्याचे जमिनीच्या 1/14 च्या उताऱयामधून सिध्द झाले आहे. त्यांच्यासह एकूण 19 जणांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे विश्वजित राणे यांचा इशारा हा नेमका कोणसाठी, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.
मंत्री विश्वजित राणे यांनी अचानकपणे वाघेरी डोंगरावरील वनराईच्या कत्तल प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. वन अधिकाऱयांना याप्ा्रकरणी तक्रार करावयास सांगितले. तसेच झाडे तोडण्यासाठी आणलेली यंत्रणा देखील ताब्यात घेण्यास सांगितले.
विश्वजित राणे यांचे व्टिट
सोमवारी सकाळीच त्यांनी ‘म्हादई’प्रश्नी आणखी आक्रमक भूमिका घेतली आणि सॅटलाईटद्वारे प्राप्त केलेली चित्रे त्यांनी एका व्टिटरद्वारे उघड केली. आपल्या व्टीट संदेशामध्ये त्यांनी म्हटले आहे की वाघेरीवर मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड केली असून हा सारा प्रकार बेकायदेशीर आहे आणि काही जमीन मालकांनी गोव्याबाहेरील व्यक्तींना ही जमीन विकल्याचा संशय व्यक्त केला आहे.
जमिनमालकांमध्ये प्रतापसिंह राणे यांचा समावेश
मंत्री राणे हे वाघेरी प्रकरणी अचानक कसे जागे झाले, याबाबत संपूर्ण गोव्यात सर्वत्र चर्चाही सुरू झाली. मात्र वाळपई भू सर्वेक्षण खात्यात ज्या सत्तरीतील वाघेरी डोंगराची नोंद आहे त्यामध्ये या जमिनींचे सुमारे 19 जण मालक आहेत. त्यात अग्रस्थानी विश्वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह रावजी राणे सरदेसाई यांचे नाव आहे. वाघेरी डोंगर आणि इतर जमीन मिळून एकूण क्षेत्रफ्ढळ हे 50 लाख 2 हजार 875 चौरस मीटर एवढे आहे. सर्वे क्र. 102 उपविभाग क्र.1 ही जागा पंचायत क्षेत्र केरी सत्तरी मध्ये येते.
प्रतापसिंह राणे यांनी दि. 12 एप्रिल 2021 रोजी तुळशिमळा पर्ये सत्तरी येथील वन अधिकाऱयांना एक पत्र लिहून आपण व इतर काहीजण मालक असलेल्या वाघेरी डोंगर व इतर परिसराच्या सीमा आरेखन करीता छोटी छोटी झुडपे तोडण्य़ाकरीता वन खात्याकडे परवानगी मागितली होती.
जमिनीचे 19 जण आहेत मालक
सर्वे क्र. 102 मध्ये उपविभाग क्र. 1 मध्ये मनोरमाबाई रावजी राणे सरदेसाई, गणपत रावजी, झोयबा सगोजी राणे सरदेसाई, कृष्णाराव सगोजी राणे सरदेसाई, दत्ताजीराव अमृतराव राणे सरदेसाई, प्रतापराव नानासाहेब राणे सरदेसाई, जपाजी नानासाहेब राणे सरदेसाई, अनंतराव दिनकरराव राणे सरदेसाई, बाळासाहेब रावसाहेब राणे सरदेसाई, गणपतराव बाळासाहेब राणे सरदेसाई, तुळशीबाई बाळा राणे, माधवराव लक्ष्मणराव राणे सरदेसाई, विश्वासराव लक्ष्मणराव राणे सरदेसाई, भगवंतराव लक्ष्मणराव राणे सरदेसाई, रामराव व्यंकटराव राणे सरदेसाई, श्रीपादराव व्यंकटराव राणे सरदेसाई, गोविंदराव व्यंकटराव राणे सरदेसाई, प्रतापसिंह रावजी राणे, हेदूराव व्यंकटराव राणे सरदेसाई व रजणीतसिंग जयसिंगराव राणे सरदेसाई यांचा समावेश आहे.
वनखात्याकडे 19 जणांनी केला होता अर्ज
प्रतापसिंह राणे यांनी तसेच इतरांनी मिळून 19 जणांच्या स्वाक्षरीने वनखात्याकडे अधिकृतपणे गेल्यावर्षी झुडपे तोडण्याची रितसर परवानगी मागितली होती. या अर्जावर प्रतापसिंह राणे, रणजीतसिंग राणे, हेदूराव राणे, हिराबाई राणे, शुभदा राणे, मोहराव राणे, यशोदाबाई राणे, रावसाहेब राणे, यशवंत राणे, धनश्री राणे, दत्ताजीराव राणे, केशवराव राणे, विश्वासराव राणे, जयंत राणे, प्रशांत राणे, अपूर्वा राणे, लक्ष्मीबाई राणे, अंकिता पाटील व अक्षया पाटील यांच्या स्वाक्षऱया आहेत.
नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी ज्या जमीन मालकांबाबत संशय व्यक्त केला आहे ती तर घरचीच मंडळी आहे हे आता उघड झालेले आहे. त्यामुळे वनमंत्र्यंचा इशारा नेमका कोणत्या दिशेने व कोणी कोणाला अंधारात ठेवून ही कामे केली ! की गेले 4 महिने वाघेरी डोंगरावर जी कत्तल चालू होती त्यावेळी त्यांना हे कसे कळले नाही! असे अनेक प्रश्न उद्भवतात.









