वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहरीनमधील मनामा येथे झालेल्या पहिल्या बहरीन पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी भरघोस यश संपादन करताना 7 सुवर्णासह 23 पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या मनिषा रामदासने दोन सुवर्णपदके मिळविली. त्याचप्रमाणे नित्या श्री सुमती सिवान, डी. पांडुरंगन तसेच एस सिवराजन यांनी सुवर्णपदके घेतली. त्याचप्रमाणे प्रमोद भगत आणि तरूण धिल्लॉ यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भगत आणि मनिष या जोडीने थायलंडच्या जोडीचा 21-14, 21-11 असा पराभव करत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले. मनिषा आणि मनदीप कौर यांनी महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी एकूण 23 पदके मिळविली. भारतीय बॅडमिंटन संघ आता येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱया चौथ्या फझा दुबई 2022 आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे.









