सातारा: विधवा प्रथा बंद करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना ‘हेरवाड पॅटर्न’ (Herwad Pattern) राबवावा असा अध्यादेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाने दिला आहे. मात्र सताऱ्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने २०१८ च्या आधी विधवा प्रथा बंदीसोबत विधवांचा पुर्नविवाह व्हावा असा ठराव केला आहे. त्यामुळे या पॅटर्नला ‘जकातवाडी, (Jakatwadi) हेरवाड पॅटर्न’ असे संबोधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले ( MLA Shivendra Raje Bhosale) यांची भेट घेतली असून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटून या संदर्भात चर्चा करणार असल्याची ग्वाही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
यावेळी शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, नुकतंच राज्य सरकारने विधवा प्रथा बंद करण्याचा आदेश काढला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतल्याने त्यास ‘हेरवाड पॅटर्न’ असे संबोधण्यात आहे. मात्र सातारा तालुक्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने चार वर्षाआधी विधवा पुनर्विवाहाचा ठराव केला इतकंच काय पण त्यांना ग्रामपंचायती तर्फे 20 हजार रूपये अनुदान ही देण्याचे ठरविले असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामस्थांच म्हणणं मांडत असताना शिवेंद्रराजे म्हणाले, जकातवाडी ग्रामपंचायतीने स्त्रियांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विधवा पुर्नविवाह व्हावा असा ठराव देखील केला आहे. मात्र शासनाने काढलेल्या अध्यादेशात जकातवाडीचा विसर पडल्याची खंत जकातवाडी ग्रामस्थांना कडून व्यक्त होत आहे. या संदर्भात या पाटर्नला जकातवाडी, हेरवाड असे संबोधण्यात यावे अशी त्यांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









