प्रतिनिधी /पर्वरी
येथील विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा सरासरी निकाल 94.29 टक्के लागला आहे. कला शाखेची शुभांगी फडते हीने 96.5 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तिला राजशास्त्र विषयात शंभर टक्के गुण मिळाले आहेत तर संस्कृत, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशस्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 99 टक्के गुण प्राप्त केले आहेत. कला शाखेत 8 विद्यार्थी विशेष श्रेणीत पास झाले आहेत.
साईशा पेडणेकर हीने 94 टक्के गुण प्राप्त करून वाणिज्य शाखेत प्रथम आली आहे. अर्पिता गावडे हीने 82.8 गुण प्राप्त करून ती विज्ञान शाखेत प्रथम आली आहे. या विद्यालयातून एकूण 263 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत 61 पैकी 53 उत्तीर्ण (86.88 टक्के), वाणिज्य शाखेत 155 पैकी 152 उत्तीर्ण (98.06 टक्के) आणि विज्ञान शाखेत 47 पैकी 43 उत्तीर्ण (91.48 टक्के) झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, प्रबंधक दत्ता नाईक, प्राचार्य दामोदर म्हार्दोळकर आणि शिक्षक वर्गाने अभिनंदन केले आहे.









