वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सामन्यात गोकुळम केरळने स्पोर्टस् ओडिशाचा 7-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले.
या सामन्यात गोकुळम केरळ संघाचे इशादाई अचेमपाँगने चार तर सौम्याने दोन आणि मनिषाने एक गोल नोंदविला. गोकुळम केरळ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात गोकुळम केरळ संघाने सलग दहा सामने जिंकून 30 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. 26 मे रोजी गोकुळम केरळ आणि सेतू एफसी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









