वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर विरूद्धच्या सामन्यात खेळताना गुजरात टायटन्स संघातील फलंदाज मॅथ्यू वेडने शिस्तपालन नियमांचा भंग केल्याने स्पर्धा आयोजकांनी त्याला सक्त ताकीद देवून या प्रकरणावर पडदा टाकला.
या सामन्यात खेळताना वेडला पंचांनी पायचीत घोषित केले पण त्यानंतर या निर्णयावर तो नाखुष दिसला. त्यानंतर डीआरएस घेतल्यानंतर वेडला पायचीत ठरविण्यात आले. मैदानातून पॅव्हेलियनकडे जाताना त्याने बेंगळूर संघातील काही खेळाडूकडे पाहून संताप व्यक्त केल्याचे आढळून आले. या सामन्यानंतर वेडने स्पर्धेच्या शिस्तपालन समितीसमोर आपला गुन्हा मान्य केल्याने त्याला ताकीद देवून सोडण्यात आले.









