ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ड्डाणानंतर काही वेळात एअर इंडियाच्या विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडल्याने या विमानाचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. (Air India plane’s engine stalled in the air, emergency landing in Mumbai)
एअर इंडियाचे मुंबई-बेंगळूर AI-639 या विमानाने सकाळी 9.43 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचे एक इंजिन थांबल्याचा संदेश वैमानिकाला प्राप्त झाला. त्यानंतर वैमानिकाने सर्व शक्यता पडताळल्या. उड्डाणानंतर साधारण 27 मिनिटानंतर म्हणजेच 10.10 मिनिटांनी या विमानाचे पुन्हा मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग करण्यात आले.
या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. आमच्या विमानाचे वैमानिक आणि इतर कर्मचारी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. हवाई वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक या घटनेची चौकशी करत आहेत. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने बेंगळूरला पाठविण्यात आले आहे.